| मा.हरी नरके |
दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण, हरी नरके आणि संभाजी ब्रिगेड, बामसेफ वाद
या विषयावरील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते विनीत वानखेडे यांचा लेख....
या विषयावरील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते विनीत वानखेडे यांचा लेख....
सध्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडला "लक्ष्य" बनवून धुळवड खेळणे चालू आहे. आणि या धुळवडीत चांगले चांगले विचारवंतही (!) आपले हात रंगवत आहेत. मूळ विषय सुरु झाला तो दादू कोंडदेव याचा पुतळा जिजापूर (पुणे) येथील लाल महालातून काढला म्हणून. हे इतिहासाचे शुद्धीकरण होते हे जवळपास सगळ्यांना मान्य आहे. पण काही विशिष्ट लोकांनी दादूचा पुतळा काढला म्हणून आरोळ्या मारणे सुरु केले आहे. नवीन हाती आलेल्या पुराव्यांवरून इतिहासाची पुनर्रचना आणि पुनर्मांडणी होणे गरजेचे असते. आणि तो इतिहास जतन करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.
पुढे वाचा...
Wednesday, March 16, 2011
संभाजी ब्रिगेड, दादू कोंडदेव व हरी नरके
प्रा. श्रावण देवरे महासचिव ओबीसी सेवा संघ 9422788546 |
हरी नरके यांनी लोकप्रभा मध्ये दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण आणि संभाजी ब्रिगेड वर लेख लिहिला. मूलनिवासी नायक मध्ये हरी नरकेंच्या विरोधात आधीपासूनच टीका टिप्पणी चालू होती. त्यामुळे सामान्य बहुजन कार्यकर्ता संभ्रमात पडला आहे. या विषयावर फारसे कुणी लिहिले, बोलले नाही. त्यामुळे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचे गैरसमज वाढीस लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी सेवा संघाचे महासचिव प्रा. श्रावण देवरे यांनी लिहिलेला लेख.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतर सांस्कृतिक क्षितिजावर बरीच वर्षे शांतता होती. 1988 नंतर फुले बदनामी प्रकरणापासून ब्राह्मणी- अब्राह्मणी छावणीमध्ये पुन्हा सांस्कृतिक युद्धाला तोंड फुटले. त्यानंतर रिडल्स, जेम्स लेन, भांडारकर व आता दादू कोंडदेव अशा चकमकी वारंवार झडायला लागल्या आहेत. जातीअंताचा लढा जसजसा तीव्र होत जाईल तसतशी या सांस्कृतिक लढ्याची गती व तीव्रता वाढत जाणार आहे. या लढ्यात अनेकांच्या कसोट्या लागणार आहेत.

No comments:
Post a Comment